शासकीय मका खरेदी केली नसल्याने शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) ऑनलाईन नोंदणी करून सुद्धा शासकीय केंद्रावर मका खरेदी करून न घेतल्याने संतप्त शेतकन्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचा इशारा दिला आहे. उपोषण वैजापूर तालुक्यात व्यापारी कमी दराने मका खरेदी करत आहे. 

हमी भावापेक्षा कमी दराने मका व्यापारी खरेदी करत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने शासकीय मका खरेदी केंद्र वैजापूर येथे सुरू झाले, मात्र या केंद्रावर देखील सर्व शेतकन्यांची मका खरेदी करण्यात आली नाही. ऑनलाईन नोंदणी करुन सुद्धा मका शासनाने खरेदी केली नाही. शासन खरेदीच्या भरवशावर शेतकरी मका विक्री साठी थांबले. 
मात्र शेतकयांची फसवणूक झाली. ऑनलाईन नोंदणी केलेल्या सर्व शेतकन्यांची मका खरेदी करण्यात याची? अन्यथा ३० एप्रिलपासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.